एस.एस. राजमौली दिग्दर्शित बहुबली चित्रपट शुक्रवारी जगभरातील चार हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अंदाजे दोनशे कोटी रुपयांचे या चित्रपटाचे बजेट असल्याचे बोलले जात आहे. तसेच या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास हा मुख्य भुमिकेत असून राणा दाग्गुबाटी, राम्या क्रिश्ना, अनुष्का व तमन्ना यांचाही अभिनय या चित्रपटात आहे.
आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात या चित्रपटासाठी प्रचंड गर्दी झाली आहे, बहुबलीकरता जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठिकाणी पोलीस दलाला पाचारण करावे लागले. तर ऑनलाइन बुकिंगने सर्व्हर हँग झाल्याचीही चर्चा असून तिकिटाच्या खिडकीवर लांबचलांब रांगा लागल्याचे वृत्त आहे. तसेच या चित्रपटाला बॉलीवूडच्या बिग बींनीही पसंती दिली आहे.
बहूबलीच्या प्रदर्शनादरम्यान एका चित्रपटगृहाला भेट देण्यासाठी आलेल्या दिग्दर्शक राजमौली यांना प्रसारमाध्यमांनी चित्रपटाबद्दल विचारले असता त्यांनी प्रतिक्रीया देण्यास नम्रपणे नकार दिला.