स्टार प्रवाह वाहिनीवरील गोठ या मालिकेने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. असंच एक नवं वळण यात पाहायला मिळणार आहे. विलास आणि राधा यांच्या नात्यात नीलाच्या रुपानं अडथळा निर्माण झाला आहे. नीलाची विचित्र अट मान्य केल्यानंतर आपली गोड बातमी राधा विलासला कशी सांगेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नात्यातले समज-गैरसमज दूर करून विलास आणि राधा जवळ आले आहेत. मात्र, नीला सतत काही ना काही खेळी खेळून त्यांच्यात दरी निर्माण करू पाहत आहे. दोन वर्ष गर्भधारणा होऊ न देण्याची नीलाची अट राधानं मान्य केली आहे. मात्र गोड बातमी कळल्यानंतर तिच्या मनात त्याविषयी द्विधा मन:स्थिती निर्माण होते. आता विलासला आणि कुटुंबीयांना राधा ही बातमी कधी आणि कशी सांगेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bigg Boss Marathi : असा असेल ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आजचा दिवस

अडचणीत आलेली राधा त्यावर मार्ग काढते का, त्यात तिला काही अडचणी येतात का, या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांतून मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah marathi serial goth new twist