वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यंदा १४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. यंदा वटपौर्णिमा हा सण विविध मराठी मालिकांमध्येही साजरा केला जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये सध्या वटपौर्णिमा साजरी केली जात आहे.
छोट्या पडद्यावरील स्वाभिमान ही लोकप्रिय मालिका म्हणून ओळखले जाते. स्वाभिमान ही मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. स्वाभिमान ही मालिका स्त्री केंद्रीत विषयांवर आधारित आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका हरहुन्नरी तरुणीची कथा उलगडली जात आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी शांतनू आणि पल्लवीचा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर आता या मालिकेत पल्लवीची पहिली वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘मेजर’ चित्रपट पाहण्याची इच्छा, कारण देताना म्हणाले…
नुकतंच या निमित्ताने स्टार प्रवाह वटपौर्णिमा विशेष उखाणा चॅलेंज दिले आहे. यावेळी पल्लवीने शांतनूसाठी खास उखाणा तयार केला आहे. सण आहे वटपौर्णिमेचा, शांतनूसोबत असचं राहू दे संसार सुखाचा, असा उखाणा पल्लवीने घेतला आहे. याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहेत. यावर तिच्या अनेक चाहत्यांनी मस्त, खूप छान, खूप सुंदर उखाणा अशा कमेंट केल्या आहेत.
“पुण्यातील चाकण हायवेवर मला दुचाकीस्वाराने धडक दिली अन्…”, बिग बॉस फेम सोनाली पाटीलने सांगितला अनुभव
इतकंच नव्हे तर ‘आई कुठे काय करते’,रंग माझा वेगळा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘स्वाभिमान’, मुलगी झाली हो, पिंकीचा विजय असो, सहकुटुंब सहपरिवार,अशा अनेक मालिका यामध्ये आहेत. या मालिकांमधील अभिनेत्री वटपौर्णिमा साजरी करताना दिसत आहेत. त्यातील सर्व नायिकांनी एकमेकींना उखाणा चॅलेंज दिले आहे. याचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने या वाहिनीवरील अभिनेत्री एकमेकींना उखाणा चॅलेंज देताना दिसत आहे. स्टार प्रवाहने यातील अनेक अभिनेत्रींची व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्री या उखाणे घेताना दिसत आहेत. अप्पूपासून ते गौरीपर्यंत सर्व अभिनेत्रींनीं सुंदर सुंदर उखाणे घेत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.