स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र या मालिकेतील प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी लवकरच स्टार प्रवाह वाहिनी नवी मालिका आणि एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर येत्या २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोन नंबर झाला लीक, विकृतांनी मेसेज फोनवर केली शरीरसुखाची मागणी

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकची कथा एक लहान मुलगी आणि तिचे गाणे यावर आधारित आहे. स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचा ही मालिका मराठी रिमेक असणार आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार असणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘…अन् काही क्षणात ती व्यक्ती दिसेनाशी झाली’, अभिनेता विराजस कुलकर्णीला पुण्यात झाला भुताचा भास

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ ही मालिका टीआरपी रेसमध्ये अव्वल ठरली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका वादामुळे या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या मालिकेतील साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांनी ही मालिका सोडली होती. त्यामुळेच ही मालिका निरोप घेत आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Story img Loader