स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. यात कानिटकर आणि वर्तक कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत लवकरच अपूर्वा वर्तकच्या आईची एंट्री होणार आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ अभिनेता चेतन वडनेरे हा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. चेतन हा या मालिकेत शशांक कानिटकर हे पात्र साकारत आहे. शशांकनंतर या मालिकेत अपूर्वा वर्तक हे पात्र प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. यात अपूर्वाची भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर साकारत आहे.

zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
एडम जे ग्रेव्स आणि सुचित्रा मट्टई यांनी दिग्दर्शित केलेल्या'अनुजा'मध्ये एका ९ वर्षीय मुलीची कथा आहे. (Photo Credit - Youtube Screen Shot)
खऱ्या आयुष्यात केली बालमजुरी, आता थेट Oscar नॉमिनेटेड शॉर्ट फिल्ममध्ये ‘ही’ मुलगी साकारतेय मुख्य भूमिका; जाणून घ्या सजदा पठाणची गोष्ट
hemant dhome Kshitee Jog
“माझं आणि क्षितीचं चौथं बाळ…”, नव्या सिनेमासाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट! प्रेक्षकांना म्हणाला…
Marathi actress Shivani Sonar Dance on Ajay Atul Song Bring it on Watch video
Video: शिवानी सोनारचा स्वतःच्याच हळदीत भन्नाट डान्स, अजय-अतुलच्या लोकप्रिय गाण्यावर अभिनेत्री थिरकली, पाहा व्हिडीओ

या मालिकेत अपूर्वा आणि शशांकची सतत सुरु असणारी नोकझोक पाहणे प्रेक्षकांना आवडत आहे. तर दुसरीकडे कानिटकरांचे एकत्र कुटुंबामुळे ही मालिका प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या मालिकेत अपूर्वाच्या आईची एंट्री होणार आहे. अंजली वर्तक असे या पात्राचे नाव असणार आहे.

“अच्छे दिन आयेंगे…”, ‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या मालिकेतील अंजली वर्तक हे पात्र अभिनेत्री मुग्धा गोडबोले साकारणार आहे. मुग्धा गोडबोले या मराठीतील उत्तम अभिनेत्री आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे संवाद लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या या लेखनाचे कौतुक होत आहे.

दरम्यान ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील नव्या पात्राबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यामुळे या मालिकेचा भाग होताना मला अतिशय आनंद होतो आहे. माझ्या पात्राचे नाव अंजली वर्तक असे आहे. या पात्राच्या येण्याने मालिकेत खळबळ उडणार आहे. अशा प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला खूप कमी येतात. आतापर्यंत मी ज्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहे त्या सर्वच खूप सोज्वळ प्रकारच्या होत्या. त्यामुळे हे पात्र साकारणं नवं आव्हान असणार आहे. यात माझा लूकही फार वेगळा असणार आहे.

मात्र ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सर्वच कलाकार दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येतं आहे. दरम्यान या मालिकेत अंजली वर्तक यांच्या एंट्रीमुळे नेमकं काय घडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader