रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाचा विक्रमादित्य मोटवानी यांची निर्मिती असलेला ‘लुटेरा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यावेळेस, “चित्रपटगृहात प्रक्षेकांना खेचण्याचे काम कलाकार करतात,” असे मोटवानी म्हणाले. २०१० साली मोटवानी यांचा रोनित रॉय अभिनीत ‘उडान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला खास यश मिळाले नसताना देखील चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले होते.
मागील आठवडयात प्रदर्शित झालेला लुटेरा चित्रपट हा १९५० च्या दशकातील एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेवेळी मोटवानी म्हणाले, चित्रपट मोठ्या प्रेक्षक वर्गाने बघण्यासाठी त्यात कलाकार मोठी मदत करतात. कलाकारांकडे चित्रपटाचा बिझनेस चालवण्याची ताकद आहे. चित्रपटाच्या यशाकरिता कलाकारांची गरज असते. रणबीर कपूर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा हे तरुण कलाकार खूप चांगले काम करत आहेत.

Story img Loader