झी टॉकिजच्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’पुरस्काराच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदा सातवे वर्ष आहे. प्रेक्षकांना या पुरस्कारासाठी ‘मिस्ड कॉल’ देऊन तसेच संकेतस्थळावरही आपले मत २१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत नोंदविता येणार आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये घोषित झालेल्या नामांकनामध्ये ‘डबलसीट’ आणि ‘टाइमपास-२’ या चित्रपटांनी सर्वाधिक नामांकने मिळविली आहेत. सवरेत्कृष्ट गायक, गायिका, गीत, नवोदित कलाकार, बाल कलाकार, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, चित्रपट तसेच स्टाइल आयकॉन, वर्षांतील लोकप्रिय चेहरा आदी गटात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा १८ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. ६६६. ९ी३ं’्र‘ी२.ूे/ेऋ‘ प्रेक्षकांना या संकेतस्थळावरूनही मत नोंदविता येणार आहे.

Story img Loader