५१ व्या महाराष्ट राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीतील नामांकने जाहीर करण्यात आली असून ७ तांत्रिक पुरस्कारांची व एक बालकलाकाराच्या पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत सेन्सॉरसंमत झालेल्या चित्रपटांचा नामांकनासाठी विचार करण्यात आला. एकूण ७३ प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.
प्राथमिक फेरीसाठी पंधरा जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अंतिम फेरीसाठी प्राथमिक फेरीत नामांकन मिळालेल्या चित्रपटांमधून पाच जणांच्या परीक्षक समितीकडून पुन्हा परीक्षण केले जाणार आहे. महोत्सवाची अंतिम फेरी लवकरच सुरू केली जाणार आहे.
तांत्रिक विभागासाठी जाहीर झालेली पारितोषिके अशी : उत्कृष्ट कलादिग्दर्शन-संतोष फुटाणे (मात), उत्कृष्ट छायालेखन-अविनाश अरुण (वीस म्हणजे वीस), उत्कृष्ट संकलन-दिपक विरकूट व विलास रानडे (रणभूमी), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण-रसूल पुकुट्टी व अमृता दत्ता (अ रेनी डे), उत्कृष्ट वेशभूषा- प्रोमिता जाधव व हर्षदा खानविलकर (दुनियादारी), उत्कृष्ट रंगभूषा-कमलाकर तानावडे (तानी), उत्कृष्ट जाहिरात- श्री व्यंकटेश्वर मूव्हीज् (१९०९), उत्कृष्ट बालकलाकार-रोहित उतेकर (टपाल) व तेजश्री वालावलकर (मात).  

Story img Loader