मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नेहमी हटके आणि वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट या वादासाठी कारणीभूत ठरला आहे. ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे सध्या चांगलीच चर्चा सुरु असून यावरुन विरोध दर्शवला जात आहे. राज्य महिला आयोगानेही याप्रकरणी आता महेश मांजरेकांकडे याप्रकरणी खुलासा मागितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकरांचा ‘कोन नाय कोनचा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप!

महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दोन मित्रांवर आधारित असलेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलं असल्याने अनेक पालकांना यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून पत्र पाठवत खुलासा मागवण्यात आला आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या आहेत –

“महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना,कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत दिली आहे.

दरम्यान चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगानेही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State woman commission president rupali chakankar letter to marathi director mahesh manjarekar over bold scenes in film sgy
Show comments