अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. गेले अनेक दिवस तो या चित्रपटावर काम करत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमधील पहलगाम येथे होत आहे. पण त्यादरम्यान या चित्रपटाच्या टीमवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहलगाम येथील मार्केटमध्ये हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. या घटनेचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी इम्रानबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “बॉलिवूडमध्ये सगळे…” प्रसिद्ध गायक लकी अलींनी सांगितलं बॉलिवूडपासून लांब राहण्याचं कारण

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
French woman raped 100 times by 50 men
French woman: १० वर्ष, ५० लोक आणि १०० वेळा बलात्कार; पत्नीला अमली पदार्थ देऊन पतीचं क्रूर कृत्य
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप

गेल्या काही दिवसांपासून इम्रान हाश्मी हा त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ नावाच्या चित्रपटासाठी चर्चेत आलेला अभिनेता आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. इम्राननं यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली होती. पण या चित्रपटाच्या कालच्या शूटिंगनंतर इम्रानला एक वाईट अनुभव आला. इम्रान आणि काही क्रू मेम्बर्स संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास ‘ग्राउंड झिरो’चे शुटींग संपवून पहलगामच्या बाजारात गेले होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक केली. सुदैवाने या दगडफेकीत कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिस ठाण्यात त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार, ‘या’ सुपरस्टारबरोबर शेअर करणार स्क्रीन

पहलगामच्या आधी इम्रान श्रीनगर येथे या चित्रपटाचे शूटिंग करत होता. श्रीनगर येथील शेड्युल संपवून ‘ग्राउंड झिरो’च्या टीमने पहलगाम येथे चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मी हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.