सध्या सोशल मीडियावर विनोदाचा बादशाह समीर चौघुले आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा फोटो व्हायरल झाला असून चर्चेत आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आदराने समीर चौघुले यांच्या समोर झुकताना दिसत आहेत. पण नेमकं असं काय झालं की बिग बींनी असे कृत्य केले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता समीर चौघुलेने स्वत: त्या फोटोमागील किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी नुकतीच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या सेटवर जाऊन बिग बींची भेट घेतली. याच सेटवरचा हा फोटो आहे. या फोटोविषयी एबीपी माझाशी बोलताना समीर चौघुले म्हणाले की, ‘आमच्यासाठी तो अविश्वसनीय क्षण होता. बच्चन सर हे हास्यजत्रेचे फॅन आहेत. ते रोज हास्यजत्रा हा शो पाहतात आणि त्यांना जेव्हा कळालं की आमचे सोनी मराठीचे फिक्शनल हेड हे आमित फाळके आहेत तेव्हा ते त्यांना भेटले. बिग बी त्यांना म्हणाले आम्ही बघत असतो सोनी मराठी. तिथे हास्यजत्रा हा शो लागतो. तो मी नेहमी पाहतो. त्यावर आमच्या आर्टीस्टला भेटाल का? आशिर्वाद द्याल का? असे आमित म्हणाले. तेव्हा अमिताभ सर लगेच तयार झाले. त्यांनी २० मिनिटांची वेळ दिली आम्हाला.’

आणखी वाचा : या’ मराठमोळ्या हास्यसम्राटासमोर चक्क शहेनशाह आदराने झुकले, फोटो व्हायरल

पुढे समीर चौघुले म्हणाले, ‘आम्ही सगळे त्यांच्या सेटवर गेलो. कारण बच्चन सरांना भेटायला मिळतय ही संधी आम्ही गमावणं शक्यच नव्हतं. हातातली सगळी कामं टाकून आम्ही सेटवर गेलो. त्यांनी सांगितल्या प्रमाणे २०-२५ मिनिटे आमच्यासोबत घालवली. ते फक्त आमचे कौतुक करत होते. आनंद याचा आहे की आमच्या कामामुळे बच्चन सरांनी आज आम्हाला ओळखलय. त्यांनी सगळ्यांना ओळखलं होतं.. प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून ते बोलत होते. मी त्यांच्या समोर गेलो आणि त्यांना सांगितलं मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत. एक म्हणजे मला तुमच्या पाया पडायचे आहे. असे बोलून मी खाली वाकलो आणि ते म्हणाले नाही नाही मी तुझ्या पाया पडतो असे म्हणून ते माझ्या समोर वाकले.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story behind viral photo of amitabh bachchan and sameer chaughule avb