संगीतबारी

संगीतबारी हा लावणीचा अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. शकुंतलाबाई नगरकर या संगीतबारीसाठीच ओळखल्या जातात. बारी म्हणजे “पाळी ”. ही पाळी प्रत्येक संध्याकाळी ठरलेल्या थिएटरमध्ये सादर होणाऱ्या संगीत-नृत्य कार्यक्रमातून येते. संगीत बारी थिएटरमध्ये “पार्टी/ पक्ष” म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिला नर्तकांचे पाच ते सहा गट काम करतात, जे थिएटरमध्ये राहतात आणि थिएटर मालकाच्या परवानगीशिवाय कधीही बाहेर पडत नाहीत. दररोज संध्याकाळी, प्रत्येक पार्टीची प्रेक्षकांसमोर नृत्य सादर करण्याची बारी म्हणजेच पाळी असते. प्रत्येक पक्षाला १० ते ३० मिनिटे दिली जातात. स्टेज शोनंतर, पुरुष प्रेक्षक खासगी बैठकीसाठी त्यांना आवडणाऱ्या पक्षाकडे जातात. जेणेकरून त्यांना एक किंवा दोन तास खासगीत महिलांच्या सादरीकरणाचा जवळून आनंद घेता येतो.

आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगराच्या सामर्थ्याची ! (भाग १)

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!

संगीतबारीतील खाजगी बैठकीचे स्वरूप

सध्या एका बैठकीची किंमत सरासरी ४००० रुपये इतकी आहे. या पैशाची विभागणी पार्टी/पक्ष आणि थिएटर मालकांमध्ये केली जाते. नर्तिकांनाही मंचकावर टिप्स/बक्षीस मिळतात. गोळा केलेल्या बक्षिसाची रक्कम नर्तकी आणि संगीत देणाऱ्या साथीदारांमध्ये वितरित केली जाते. एक लोकप्रिय नृत्यांगना/कलाकार तिच्या पक्षासाठी आणि थिएटरसाठी जास्त उत्पन्न देणारी ठरते. शकुंतलाबाईंची पहिली टीप १ रुपये होती, एका रुपयात त्या १९७० च्या दशकात जेवण खरेदी करू शकत होत्या. शकुंतलाबाई यांनी १९७४ साली मुंबईमधील लालबाग येथील हनुमान थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वेळी त्या कथक गुरु वसंतराव घाटगे यांच्या शिष्या बनल्या. शकुंतलाबाईंनी नमूद केल्याप्रमाणे औपचारिक शिक्षण पद्धतीच्या अनुपस्थितीत, लावणी नर्तकीचे सर्वात मोठे शिक्षण हे इतरांना पाहून होते. त्यांना स्वतःला वेगवेगळ्या लावणी नर्तिकांचे निरीक्षण करताना खूप मजा यायची. त्या त्यांचे अनुकरण करायच्या. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याच्या स्पर्धेमुळे मला अधिक शिकायला मिळाले. या शिकण्यातील लोकांच्या डोळ्यात पाहणे हा सर्वात महत्त्वाचा धडा होता. संकेत न देता शकुंतलाबाई नृत्य करताना थेट नजरेचा कटाक्ष टाकतात. ‘प्रेमाने थेट टक लावून पाहणे हे हृदयाचा ठोका चुकविणारे असते. लावणीत प्रेक्षकांशी थेट नजरानजर हे महत्त्वाचे असते. यामुळे प्रेक्षकांना वाटते की ते इंद्रदेव आहेत आणि लावणी अदाकारी करणाऱ्या या अप्सरा. स्टेज शो संपल्यावर ते नृत्यांगनेशी बोलायला येतात. नृत्यांगना त्यांना पान किंवा चहा देतात. याचवेळेस खाजगी बैठकीसंदर्भात विचारणा होते… अशा प्रकारे त्यांची उपजीविका चालते, असे शकुंतला बाईंनी सांगितले.

संगीतबारीमध्ये ग्राहकांनी नर्तकीला माहीत नसलेल्या गाण्याची फर्माईश (विनंती) केली आणि नर्तिकेला ते गाणं माहीत नसेल तर मिळणारे उत्पन्न कमी होते. यामुळे ग्राहक हा दुसऱ्या नर्तकीकडे जातो. शकुंतलाबाईंनी शास्त्रीय आणि चित्रपट गीतांपासून ते भावगीत आणि भजनांपर्यंत सगळ्यावर प्रभुत्व मिळवले होते. कधी-कधी जुने ग्राहक शकुंतलाबाईंना दुर्मीळ लावणी गाणी शिकवायचे किंवा तिचे अभिनय सुधारण्यास मदत करत होते. त्यांच्या आईप्रमाणेच त्यांचाही आवाज दमदार आवाज होता.

संगीतबारी हेच प्रेम

संगीतबारीमध्ये पुरुष प्रेक्षक हे प्रियकर किंवा प्रेमी नसतात. नर्तिका ग्राहकांना भेटतात, तिथेच त्यांचे संबंध तयार होतात. , एकदा संबंध तयार झाले की त्या पुरुषाला मालिक किंवा मास्टर म्हणतात. शकुंतलाबाईंच्या पहिल्या नात्यात प्रेम नव्हते. तो (पुरुष ग्राहक) एक वर्ष त्यांच्या शोमध्ये येत राहिला, त्याने शकुंतलाबाईंनी मागितलेल्या सोन्या-चांदीपासून ते कपडे, पैशांपर्यंत सर्व गोष्टी दिल्या. यापलीकडे एखाद्या मुलीला अजून काय हवं असतं? असंही त्या म्हणतात. त्यानंतर त्याचे त्यांच्या बहिणींशी सूत जुळले आणि ती त्याच्याबरोबर निघून गेली. मूलतः तो विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता. ज्यावेळी शकुंतलाबाई गरोदर राहिल्या, त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला होता.

येथील नर्तिका त्यांना हव्या असलेल्या पुरुषापासून मुलांना जन्म देतात. जर दोन ग्राहक असतील तर त्या ठरवतात कुणाला प्रोत्साहन द्यायचे. काही ग्राहक बदमाश किंवा वाईट असतात, त्यामुळे त्यांना टाळले जाते. जन्माला येणारी मुले त्यांच्या आईचे आडनाव लावतात. या मुलांमध्ये वडिलांना स्वारस्य असो वा नसो, त्याने त्या नर्तिकेला काही फरक पडत नाही. कारण त्या त्यांच्यावर अवलंबून नसतात. शकुंतलाबाई नगरकर यांनी स्वतःच्या बाबतीतच घडलेला प्रसंग सांगितला. त्यांच्या मुलाच्या वडिलांनी – एका ग्राहकाने नंतर दुसऱ्या एका नर्तिकेशी संबंध प्रस्थापित केले. यावर त्या म्हणाल्या ‘हम आदमी लोगों का टेंशन नहीं लेते’. त्यांना स्वतःला कुंकू लावायला आवडते, त्याला विशिष्ट कारण असे नाही. त्यांनाच लवकर मुले हवी होती, जेणेकरून त्यांचे वय वाढल्यावर, मुले तरुण होतील. प्रत्येक प्रसूतीपूर्वी त्या योग्य निगा राखण्यासाठी अहमदनगरला घरी जात असत.

आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … ‘गौतमी पाटील घुंगरूसुद्धा घालत नाही परंतु हा तिचा.. (भाग ३)

एक भावनिक बाजू …

शकुंतला यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलीच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण तयार झाले. मुलीच्या जन्मानंतर शकुंतलाबाईंनी चौफेर पेढे वाटले. या कलेत मुलीच कमावतात. मुलं काहीच करत नाहीत. बहुतेक मुलं बसून खातात,असं त्यांनी नमूद केले. शकुंतलाबाईंनी आपल्या मुलांना अहमदनगरमध्ये ठेवले. त्यांचे संगोपन त्यांचा भाऊ आणि त्याच्या पत्नीने केले. शकुंतलाबाईंनी मुलांच्या संगोपनासाठी पैसे पाठवले पण त्यांच्यापासून लांब राहण्याचे दुःख त्यांना सहन करावे लागले. याविषयी दुःख व्यक्त करताना त्या म्हणतात “मला त्यांचा वाढदिवस कधी साजरा करायला मिळाला नाही. आज माझी मुलं मोठी झाली आहेत, पण मी त्यांचे सर्व वाढदिवस साजरे करणार आहे. शकुंतलाबाईंच्या एकाही मुलीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले नाही.

त्यानंतरच्या काळात शकुंतलाबाईंच्या आयुष्यात परिवर्तनाचा काळ आला, अधिक वाचा भाग ३: व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगराच्या सामर्थ्याची !