शकुंतलाबाई नगरकर यांचा नृत्यप्रकारात शृंगारिक नखरा (a flirty style), खेळकर आणि छेडछाड या अदा असणाऱ्या शैलीत आहे.

लावणी हा शब्द ‘लावण्य’ या मूळ शब्दावरून आल्याचे मानले जाते; याशिवाय लावणी या शब्दाची व्युत्पत्ती नक्की काय? याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहे. लावणी हा एक शृंगारिक नृत्य प्रकार आहे. या नृत्य प्रकारात सुंदर- चमकदार नऊवारी साडी परिधान करून नृत्य सादर केले जाते. या नृत्य प्रकारासाठीची गाणी अर्थपूर्ण असतात, विशेष म्हणजे ही गाणी पुरूष प्रेक्षकांसाठी पुरूष कवीच्या लेखणीतून अवतरतात. गाण्यांचे विषय हे राजकारणापासून ते देशभक्तीपर्यंत असतात; परंतु, या गाण्यांचा गाभा मात्र शृंगाराचा असतो. लावणी या नृत्यप्रकारचा प्रत्यक्ष दस्तावेजीय पुरावा हा १७ व्या शतकातील आहे. त्या वेळेस प्रवासी भटक्या समूहांनी मैदानात मंच उभारला आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील गर्दी त्याकडे आकर्षित झाली. कुस्तीचे आखाडे, आकाशपाळणा यांच्याबरोबरीनेच लावणी हा गावात भरणाऱ्या जत्रांचा अविभाज्य भाग झाला. लावणी हा नृत्य प्रकार जसा खुल्या मैदानात सादर केला जातो तसा, बंद सभागृहातदेखील सादर होतो. लावणीच्या प्रसिद्ध विविध प्रकारांमधील एक म्हणजे ‘संगीतबारी’. या संगीतबारीच्या परंपरेला नावलौकिक मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लावणी अदाकार म्हणजे ‘शकुंतलाबाई नगरकर’

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या दीपानीता नाथ यांच्याशी संवाद साधताना ‘शकुंतलाबाई नगरकर’ यांनी आपल्या कलेचे आणि आयुष्याचे अनेक अनभिज्ञ पैलू उघड केले.

आणखी वाचा : विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय? 

कोण आहेत शकुंतला बाई नगरकर?

शकुंतला बाई नगरकर या संगीतबारी या लावणीच्या पारंपरिक प्रकारातील शेवटच्या काही वेगळ्या नर्तकींपैकी एक आहेत. २००९ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शकुंतलाबाई या ‘कोल्हाटी’ या भटक्या समाजातील आहेत. हा कोल्हाटी समाज गावोगावी भटकतो आणि तमाशा व लावणी सादर करतात. शकुंतला यांचे कुटुंब अहमदनगरमध्ये शेतकरी म्हणून स्थायिक झाले होते, तिथेच १९६० साली शकुंतलाबाईंचा जन्म झाला. शकुंतला यांच्या आई छबूबाई नगरकर या देखील लावणी नृत्यांगना होत्या. छबुबाई या त्यांच्या घरातील पहिल्या महिला होत्या ज्या पुन्हा एकदा लावणी नृत्याकडे वळल्या. शकुंतलाबाई सांगतात, लावणी हा एक पिढीजात कला प्रकार आहे, ती कला वारसाहक्काने आईकडून मुलीकडे जाते. शकुंतलाबाई अगदी लहान असल्यापासून रेडिओवर जिंगल ऐकताच थिरकायला लागायच्या. शाळेच्या वाटेवरही त्या नृत्य करायच्या, त्यांनी वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यासाठी सर्वांनी त्यांच्यावर भेटवस्तू आणि प्रेमाचा वर्षाव केला होता. छबूबाईंनी १९६८ साली मुंबईतील ऐतिहासिक पिला हाऊस किंवा प्ले हाऊस थिएटरमध्ये नृत्य करण्यास सुरुवात केली तेव्हा; त्यांनी शकुंतला यांना कथ्थक विशारद गोविंदराव निकम यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले.

छबूबाईंच्या पाठोपाठ त्यांची धाकटी बहीण आणि नंतर त्यांच्या मोठ्या मुलींचे रंगमंचावर पदार्पण झाले. चौथ्या इयत्तेत असताना शकुंतलाबाईंचेही रंगमंचावर पदार्पण झाले. लावणीची गाणी लिहिता-वाचता येतात ते पुरेसे आहे, असे त्यांच्या आईंचे म्हणणे होते. शकुंतलाबाई म्हणतात, त्या स्वतः कधीच महत्त्वाकांक्षी नव्हत्या. परंतु, त्यांच्या आईला त्या प्रसिद्ध होणार असा विश्वास होता.

विवाह नाही…

शकुंतलाबाईंनी वयाच्या ११ व्या वर्षी बीडमधील परळी वैजनाथ येथील सभागृहातील कार्यक्रमात सर्वात प्रथम घुंगरू बांधले. परंपरेनुसार एकदा का नृत्यांगनेने घुंगरू स्वीकारले की, ती नर्तकी कधीही विवाह करत नाही असा प्रघात आहे. घुंगरू बांधण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रसंग समारंभ किंवा उत्सवाने साजरा केला जात नाही. शकुंतलाबाईंच्या बाबतीत त्यांच्या बहिणीने त्यांना नऊवारी साडी नेसवली होती व पायात घुंगरू बांधून मंचावर पाठविले होते. लावणीसाठी वापरण्यात येणारे घुंगरू हे भरतनाट्यम व कथक यांच्या तुलनेने जड असतात. शकुंतलाबाईंचे पहिले घुंगरू प्रत्येकी दोन किलोचे होते. वर्षानुवर्षे या घुंगरांचे वजन वाढतच राहिले आणि ते १० किलो पर्यंत पोहचले.

लावणीच्या- लोककलाकारांची व्यथा

शकुंतलाबाई या पुणे शहरापासून थोडं दूर निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्या सांगतात, लावणी कलाकारांकडे आदराने पाहिले जात नाही. शहरात हे जाणवत नाही. शहरात लोकांना कलाकारांसंदर्भात कुतूहल असते. मी टीव्ही वर दिसते त्यामुळे लोक मला ओळखतात. परंतु, अनेक लावणी कलाकार स्वतःची ओळख जिथे राहतात त्या हाऊसिंग कॉलनीज पासून लपवून ठेवतात. शकुंतलाबाईंच्या जीवनावर अनेकांनी पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांनी त्या ऑफर्स नाकारल्या. ‘आज काल कोण वाचतं? लोक एक-दोन पान चाळून पुस्तके बाजूला ठेवतात. सर्व लोककलाकार आपली सर्वोत्तम वर्षे कलेसाठी समर्पित करतात परंतु त्यांना कधीही मान्यता- सन्मान मिळत नाही. मग माझ्या आयुष्याबद्दल जगाला सांगण्यात मला रस का असावा?” त्या सवाल करतात.

लावणीच्या- लोककलाकारांची व्यथा- स्वानुभव

काही वर्षांपूर्वी शकुंतलाबाई नगरकर यांना दिल्लीतील एका मैफिलीत सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते, तिथे त्यांना एका शास्त्रीय नर्तिकेकडून हीन वागणूक मिळाली होती. असे असले तरी त्याक्षणी शकुंतलाबाई यांच्याकडून रागाच्या भरात कुठलाही अपशब्द गेला नाही. याच मैफिलीत शकुंतलाबाई यांना नृत्यासाठी अर्धा तास देण्यात आला होता. परंतु एक तास उलटला तरी त्या नृत्य करत होत्या आणि त्यांच्या घुंगराच्या तालावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. मैफिल संपायची वेळ आली तरी प्रेक्षक त्यांच्या नृत्यात गुंग झाले होते, त्यांचेच नृत्य अजून काही वेळ सादर व्हावे यासाठी मागणी करत होते. या प्रसंगासंदर्भात त्या म्हणतात ‘बॅण्ड वाजवायचाच असेल तर तो रंगमंचावर वाजवायचा’, ती प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना असून देखील तिने लोककलाकाराचा अनादर करण्याची चूक केली.

आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … अन् विश्वासघात करणाऱ्या पुरुषांनाही अपराधीपणा वाटू लागला ! (भाग २)

यापुढे जावून शकुंतलाबाई नगरकर यांनी संगीत बारी म्हणजे नक्की काय ? विवाह नाही मग पुढे काय? त्यांच्या मुलांचे काय झाले? याविषयी स्वानुभवाचे बोल कथन केले आहेत….यासाठी वाचा भाग २ : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगराच्या सामर्थ्याची !

Story img Loader