बॉलिवूडमधल्या अभिनेत्या, सहकलाकार उशीरा का होईना पण निर्भीडपणे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. तनुश्री , कंगना यांसारख्या अभिनेत्रींनी मी टू सारख्या मोहीमेला आखणी बळ दिलं आहे. अशात बॉलिवूडची काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटात ‘स्त्री’ या भूताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री फ्लोरा सायनी हिच्या पोस्टनं पुन्हा एकदा बॉलिवूड हादरलं आहे. २००७ मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी निर्माता गौरांग दोशी यांनी आपल्याला मारहाण केली होती, गौरांग यांनी अशा अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं पण आम्ही काहीच करू शकलो नाही. या क्षेत्रात त्याचा दबदबा होता याचाच गैरवापर करून त्यानं सगळ्यांची तोंडं बंद केली.

माझं गौरांगवर प्रेम होतं, आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत होतो. पण सारं फिस्कटलं त्यानं मला गंभीर मारहाण केली. पण माझ्यावर तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. त्यानं माझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. मला या क्षेत्रात कुठेही काम मिळणार याची पुरेपुरे दक्षता त्यानं घेतली. मला ऑडिशनमध्ये सहभागी होण्यापासून रोखलं. पण, आता परिस्थिती बदलली आहे. महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. अनेक महिलांनी आता न घाबरता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. या लढाईत एक दिवस आपण नक्की विजयी होऊ असं तिनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stree actress flora saini sexual harassment assault producer gaurang doshi