गेले काही महिने सातत्याने ‘तमाशा लाइव्ह’ या संजय जाधव दिग्दर्शित बहुकलाकार असलेल्या संगीतमय चित्रपटाची चर्चा सुरू आहे. वेगळं कथानक, गाणी यांची चर्चा असलेला हा चित्रपट नेमका काय?, त्यामागची प्रेरणा आणि अनुभव याविषयी खुद्द दिग्दर्शक संजय जाधव आणि कलाकार सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयात येऊन मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

आत्तापर्यंत विविध विषय हाताळले गेले आहेत. यात पत्रकारितेच्या माध्यमातून कथा मांडण्यात आली असली तरी हा चित्रपट संगीतमय आहे. एक वास्तववादी घटना संगीतमय पद्धतीने आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न ‘तमाशा लाइव्ह’ या चित्रपटातून केला आहे आणि हेच त्याचं वैशिष्टय़ म्हणता येईल, असे संजय जाधव यांनी सांगितलं. गाण्यातून संवाद आणि संवादातून पुन्हा गाणं हे कधी सुरू होतं, एका स्वरूपातून दुसऱ्यात ते सहजपणे कसं शिरतं हे तुम्हाला कळतही नाही. त्यासाठी गाणी आणि संवाद एकमेकांमध्ये योग्य पद्धतीने गुंफणं, त्याचा ताल पकडता येणं, योग्य वेळी संवाद सुरू होतील याची काळजी घेणं यावर आमच्या चमूने खूप काम केलेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेकविध प्रकारचे चित्रपट आपण पाहिले आहेत. पण मराठीतच नव्हे तर हिंदीतही ‘तमाशा लाइव्ह’ चित्रपटासारखा प्रयत्न याआधी कोणी केलेला नाही हे सांगण्याचं धाडस मी करू शकतो. इतका वेगळा प्रयत्न आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे, असं दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितलं.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!

‘शिकागो’ची प्रेरणा ’

खूप वर्षांपूर्वी ‘शिकागो’ नावाचा एक चित्रपट आला होता, ज्याला ऑस्कर मिळाले होते. मी गेईटीला तो चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट पाहून मी इतका भारावून गेलो होतो की असं काहीतरी आपण करायला हवं हा विचार डोक्यात होता. त्या वेळी मी फक्त कॅमेरामन होतो. नंतर मी मुख्य छायाचित्रणकार झालो, दिग्दर्शक झालो, पण तो फॉर्म काही माझ्या डोक्यातून गेला नव्हता. आपण असं ठरवलेलं असतं ना की आयुष्यात मला काहीतरी करायचं आहे. तशी माझी प्रत्येक चित्रपटाच्या वेळी संगीतमय चित्रपट करायची इच्छा प्रबळ होत गेली. ‘चेकमेट’ करताना, ‘रिंगा रिंगा’ करताना प्रत्येक वेळी मला तो संगीतमय करायचा असायचा. तेव्हा माझा मित्र दिग्दर्शक निशिकांत कामत माझ्यावर चिडला होता की तुझं हे ‘शिकागो’प्रेम आता पुरे कर. तो फॉर्म इथे चालणार नाही. निशिकांत आता आपल्यात नाही आहे, पण तो चित्रपट करायची माझी इच्छा काही कमी झाली नाही. हल्लीच मी ऐकलं जेव्हा संगीतकार अजय – अतुल यांना एका कार्यक्रमात कुणीतरी सांगितलं की मी अशा पद्धतीचा संगीतमय चित्रपट करतो आहे. तेव्हा त्यांच्याही तोंडून झालं का त्याचं स्वप्न पुरं.. असं सहजपणे बाहेर पडलं. इतकं माझं हे स्वप्न चित्रपटसृष्टीत सगळय़ांना माहितीचं झालं होतं.

– संजय जाधव

‘एका चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा.. ’

मी इतकी वर्ष म्हणजे गेली वीस वर्ष चित्रपटांतून काम करतो आहे, पण अशा प्रकारे एक वेगळा विषय मांडू पाहणाऱ्या आणि स्वतंत्र फॉर्ममधल्या चित्रपटाचा भाग होता आलं याचा मला आनंद आहे. ‘तमाशा लाइव्ह’ असं या चित्रपटाचं नाव आहे. तमाशा हा आपल्याकडचा लोकप्रिय संगीतप्रकार आहे, पण इथे हा तमाशा लाइव्ह म्हणजे त्याला आणखीही वेगळे अर्थ आहेत. आपण रोज आपल्या आजूबाजूला काहीना काही घडताना पाहतो आहोत, आणि आपल्या तोंडून सहज निघून जातं अरे काय तमाशा लावला आहे हा.. म्हणजे आपल्या आजूबाजूला रोज लाइव्ह तमाशा घडतो आहे. आपण सगळे तो बघतो, अनुभवतो. हे वास्तव मांडताना त्यातून काही ठोस विचारही संजय जाधव यांनी मांडला आहे. म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन करणारा हा चित्रपट आहेच. पण मनोरंजनाची मात्राही दोनशे टक्के आहे आणि याआधी पाहिली नसेल, अशा प्रकारच्या मांडणीतील ते मनोरंजन आहे. आत्तापर्यंत मला जेवढय़ा व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या आहेत त्याच्या दुप्पट व्यक्तिरेखा मी या एका चित्रपटात केल्या आहेत. त्या भूमिका करण्याआधीची तयारी म्हणून अगदी नवख्या विद्यार्थ्यांसारखे आम्ही संजय जाधव यांच्या घरी रोज जायचो. ती प्रक्रिया समजावून घ्यायचो. आमच्या कार्यशाळा झाल्या. असं समजून उमजून एक वेगळय़ा प्रकारे काम करणं पहिल्यांदाच या चित्रपटामुळे अनुभवलं.

-सिद्धार्थ जाधव

‘जॅझ, भांगडा आणि भरतनाटय़मही ’

या चित्रपटात मी एका पत्रकाराची भूमिका करते आहे. पत्रकारिता करणं ही खचितच सोपी गोष्ट नाही. प्रत्यक्ष घटनांचं वार्ताकन हे अवघड आहे. तसंच ते लोकांसमोर मांडताना प्रत्येक वेळी घडणाऱ्या बारीकसारीक तपशिलांची नोंद घेणं. ते परिस्थितीचं भान ठेवून पोहोचवणं अशा वेगवेगळय़ा टप्प्यांवर पत्रकारांना सावध आणि जागरूक असावं लागतं. त्यामुळे कथेची ही पार्श्वभूमी आणि त्याला जोड म्हणून येणारे वेगवेगळे संगीताचे प्रकार सादर करणं हेही एक आव्हान होतं. म्हणजे मला उत्तम नृत्य येतं, पण या एकाच चित्रपटात मी भांगडाही केला आहे. भरतनाटय़मही केलं आहे आणि जॅझवरही नृत्य केलं आहे. मराठीत पहिल्यांदाच जॅझ संगीत पाहायला मिळणार आहे.

-सोनाली कुलकर्णी