‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्याचसोबत यामध्ये हॉलिवूड स्टार विल स्मिथ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. विल स्मिथने खास गाण्याचं शूटिंग केलं असून त्याची झलक करण जोहरने ट्विटरवर शेअर केली आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर’मधील ‘राधा’ हे गाणं फार प्रसिद्ध झालं होतं. त्याच गाण्यावर आता विल स्मिथ थिरकताना दिसणार आहे. अनन्या आणि तारासोबत विल स्मिथ या बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरत आहे. विल स्मिथला अशाप्रकारे बॉलिवूड गाण्यावर नाचताना पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असेल.

या सीक्वलमध्ये आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

करणच्या या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करणच्या या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, आता नव्या स्टुडंट्सची ही टोळी प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader