प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई या चित्रपटाचा सिक्वल किंवा रिमेक बनविण्याचा विचार करत आहेत. घई यांनी ‘पीटीआय’ला सांगितले,  आम्ही खलनायक चित्रपटासाठी काही योजना आखत असून, त्यावर काम सुरू आहे. या चित्रपटासाठी काही दिग्दर्शकांची नावे आमच्या नजरेसमोर असून, लवकरच याबाबत घोषणा  करण्यात येईल. या पेक्षा जास्त आता काही सांगता येणे शक्य नाही. त्याचप्रमणे चित्रपटाच्या कथेचे सादरीकरण आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader