रुजुता दातार

छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णकाळ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतील चित्रशृंखलेतून ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनिखड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला. या चारही यशस्वी चित्रपटानंतर ‘शिवराज अष्टका’तील पाचवे पुष्प म्हणून ‘सुभेदार’ या नव्या ऐतिहासिक पटाची घोषणा करण्यात आली. इतिहासात नाव कोरणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे  यांच्या जीवनाची महाचरित्रगाथा ‘सुभेदार’ चित्रपटातून उलगडणार आहे.

Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?

तानाजींच्या जन्म आणि कर्मभूमीत संहितेची पूजा

‘सुभेदार’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, शीर्षक भूमिकेतील अभिनेता अजय पूरकर, त्यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे, शेलार मामांच्या दमदार भूमिकेतील अभिनेता समीर धर्माधिकारी आणि चित्रपटाचे निर्माते आदी मंडळींनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील गोडवली या तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी भेट दिली. मालुसरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत ‘सुभेदार’ चित्रपटाच्या संहितेचे आणि तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या चित्रपटाची मुहूर्तमेढ करण्यात आली. पोलादपूर तालुक्यातील उमरठ या तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या गावी तानाजी मालुसरेंच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे पूजन करत नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस्थळी ‘सुभेदार’ चित्रपटाच्या संहितेचे पूजन करून तानाजी आणि शेलारमामा यांच्या चरणी संहिता अर्पण करण्यात आली. 

‘आम्ही तानाजी मालुसरेंच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीतून चित्रपटासाठी एक नवीन ऊर्जा घेऊन जात आहोत. या नव्या ऊर्जेनेच चित्रीकरणाला आम्ही सुरुवात करणार आहोत’, असे सांगत ८६ गावातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबीयांनी आमच्या संपूर्ण टीमला आर्शीवाद दिल्याबद्दल दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आभार व्यक्त केले. तर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांनी मालुसरे कुटुंबीयांकडून आशीर्वाद मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. तर या चित्रपटात शेलार मामांची भूमिका साकारणाऱ्या समीर धर्माधिकारी यांनी दिग्पालचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा खूप अभ्यास असल्यामुळे मला भूमिकेच्या निमित्ताने नव्याने इतिहास समजला, असे सांगितले.

८६ गावांतील मालुसरेंनी लावली हजेरी

यावेळी दिग्पाल लांजेकर यांनी ‘सुभेदार’ चित्रपटातील पहिल्या दृश्याचे वाचन केले. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची महती वर्णन करणारा प्रसंग ऐकतानाच उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्य कमिटी, कुणाल मालुसरे (लव्हेरी), रवींद्र तुकाराम मालुसरे (आंबे शिवतर), आबासाहेब मालुसरे (गोडवली), बाळासाहेब मालुसरे (निगडे), संतोषभाऊ मालुसरे (लव्हेरी), मंगेश मालुसरे ( गोडवली ), नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती ऊमरठ,  चंद्रकांत दादा कळंबे (अध्यक्ष), अनिलराव मालुसरे, डॉ. शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, ओंकारराजे मालुसरे (पारगड), ८६ गावातील मालुसरे परिवार, १२ मावळ परिवार, इंद्रजीत जेधे, राहुल कंक, अक्षय बांदल, गोरख दादा करंजावणे, गणेश खुटवड पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित  होती.

Story img Loader