मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. वैविध्यपूर्ण भूमिका सकारत तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. काही दिवसांपूर्वीच तो ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ सुबोधने आणखीन एका चित्रपटाची घोषणा केली आहे.

आणखी वाचा : “.. ही लज्जास्पद गोष्ट,” बॉयकॉट प्रकरणात शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिला आलिया – रणबीरला पाठिंबा

Mahesh Manjrekar
“प्रेक्षकांना नेहमी…” महेश मांजरेकर यांना नवीन कलाकारांविषयी काय वाटतं? म्हणाले, “मला कौतुक…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…
saif ali khan home lit up like diwali
घराला आकर्षक रोषणाई, बहिणीची खास पोस्ट अन्…; जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान परतला, Video आला समोर

अभिनेता सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून या त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून तो पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘निरवधी’ आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुबोधबरोबरच महेश मांजरेकर यांनीही एक फोटो शेअर करत या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

या चित्रपटात सुबोध भावेबरोबरच उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले हे कलाकारही महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. सुबोधने या नव्या चित्रपटाची बातमी सांगितल्यावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्ही आता २०२३ ची वाट पाहतो, असंही म्हटलं आहे. काहींनी निरवधी शब्दाचा अर्थ विचारला आहे. दरम्यान, सुबोधचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सुबोधच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader