‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर अभिनेता सुबोध भावे यशाच्या शिखरावर आरुढ झाला आहे. का रे दुरावा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सुबोध सध्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत व्यस्त आहे. यातच तो आता एक मल्याळम चित्रपट करणार असल्याचे समजते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या ‘पिन्नेयुम’ या चित्रपटाद्वारे सुबोध मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.
सुबोध सध्या गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘TTMM’ आणि स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘फुगे’ या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. त्याचसोबत तो लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave bags adoor gopalakrishnans malayalam film