छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अखेर शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि इशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. लोकप्रियतेमध्ये अग्रस्थानी असलेली ही मालिका संपल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळेच अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक खास संदेश दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आणि आज मालिका संपली.तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम आयुष्यभर आम्हाला ऊर्जा देत राहील. झी मराठी वाहिनी,आमचे निर्माते, दिग्दर्शक,तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांमुळे ही मालिका झाली. तुमचे “तुला पाहते रे” संघाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. ” विक्रांत ” कडून खूप प्रेम. भेटूया लवकरच. रामराम”, असं ट्विट करत सुबोधने साऱ्यांचे आभार मानले.


दरम्यान, ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेकांनी या मालिकेवर भरभरुन प्रेम केलं. या मालिकेमध्ये सुबोध भावेने विक्रांत सरंजामे या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला. त्यासोबतच गायत्री दातारनेदेखील इशा निमकर आणि राजनंदिनी सरंजामे या व्यक्तिरेखा उत्कृष्टरित्या साकारल्या. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave serial tula pahate re off air ssj