मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. यावरुन बराच वादही झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतंच आता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच सुबोधने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत स्वत: सुबोध, मेधा इनामदार आणि ऋषिकेश गुप्ते हे तिघेजण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा :‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद मिटणार? ‘झी वाहिनी’कडून मोठा निर्णय; परिपत्रक केलं जारी
“एक स्वप्न तुम्ही १३ वर्षे पाहत असता, कधी अशी वेळ येते आणि वाटतं की हे नाही होऊ शकत पूर्ण, पण तेव्हाच काही व्यक्ती भेटतात आणि तुमची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होते. धन्यवाद मेधा इनामदार ताई, ऋषिकेश गुप्ते. अतुल केतकर या फोटोत तुला मिस करतोय”, असे सुबोध भावेने यात म्हटले आहे.
दरम्यान सुबोध भावेच्या ही पोस्ट नक्की कशाबद्दल आहे, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. त्याच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सध्या या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या चित्रपटातून इतिहासाची तोडमोड करुन दाखवण्यात आल्याचे बोललं जात होत.
त्यातच संभाजी ब्रिगेडने आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर आता अखेर निर्मात्यांनी एका पाऊल मागे घेतले आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा किंवा ते हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानतंरच हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.