दाक्षिणात्य अभिनेते विजया कृष्ण नरेश व अभिनेत्री पवित्रा लोकेश गेले अनेक महिने खूपच चर्चेत आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे त्यांचं नातं. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत ते लग्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तर नुकतेच ते विवाहबद्ध झाले. आता अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीने तिच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
नरेश यांची तिसरी पत्नी राम्या रघुपती यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता त्यांनी पवित्रा यांच्याशी चौथं लग्न केलं आहे. आधीच्या तीन लग्नांपासून नरेश यांना तीन मुलं आहेत. पवित्रा यांचंही हे तिसरं लग्न आहे. पवित्रा यांनी सॉफ्टवेअर इंजिनीयरबरोबर पहिलं लग्न केलं. त्यानंतर अभिनेता सुचेंद्र प्रसादबरोबर त्यांनी दुसरं लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुचेंद्र व पवित्रा यांना दोन मुलंही आहेत. आता त्यांचा आधीचा पती सुचेंद्र प्रसाद यांनी या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : ‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”
सुचेंद्र प्रसाद यांनी म्हंटल, “पवित्राला लग्झरी आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी ती काहीही करू शकते. ती खूप संधीसाधू आहे. नरेशशी लग्न करण्यात तिचा नवा प्लॅन असणार. नरेशलाही पवित्राचे हेतू लवकरच समजतील. पवित्रा लोकेश चांगली व्यक्ती नाही. पैशासाठी ती काहीही करू शकते.”
सुचेंद्र व पवित्रा यांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर २०२१पासून नरेश व पवित्रा लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेली दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नरेश यांच्या चौथ्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.