अभिनेत्री सुचित्रा सेन यांना श्वसनक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना ‘सीसीयू’मध्ये (हृदय काळजी विभागात) दाखल करण्यात आले आहे.
बेल्ले व्यू क्लिनिकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुचित्रा यांना जास्त त्रास होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना सीसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ८२ वर्षीय सुचित्रा यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
सुचित्रा सेन यांनी १९५२ साली बंगाली चित्रपट शेष कोथाईपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९५५मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट देवदासमध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

Story img Loader