लेखिका व समाजसेविका सुधा मूर्ती या कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ७३ वर्षीय सुधा मूर्ती यांनी नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल भाष्य केलं. तसेच आपल्या जीवनावर चित्रपट बनल्यास कोणत्या अभिनेत्रीने त्यात मुख्य भूमिका साकारावी, यावरही उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई लिट लाइव्हच्या १४ व्या आवृत्तीच्या शेवटच्या दिवशी ‘पीपल ऑफ द लँड’ या सत्रात इशिता ठाकूरने सुधा मूर्ती यांना विचारलं की त्यांच्या जीवनावर आधारित बॉलीवूड किंवा हॉलीवूड चित्रपटात त्यांची भूमिका कोणत्या अभिनेत्रीने केलेली आवडेल. उत्तर देत सुधा म्हणाल्या, “मी आता जाड असले तरी एकेकाळी मी तरूण आणि सडपातळ होते. त्यामुळे आलिया भट्टने माझी भूमिका केलेली मला आवडेल. मी तिच्याइतकी सुंदर नाही पण मी जेव्हा तरुण होते तेव्हा लठ्ठ नव्हते.” यावेळी त्यांनी आलिया भट्टचं भरभरून कौतुक केलं. “आलिया फक्त दिसायला सुंदरच नाही तर ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. ‘राझी’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील तिचा अभिनय पाहा,” असं सुधा यांनी नमूद केलं.

“संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला…” मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “आम्हाला तुमची…”

तुमचे पती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची भूमिका कोण करणार? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की याबद्दल त्यांनाच विचारलेलं चांगलं राहील. “कारण मूर्ती खूप गंभीर व्यक्ती आहेत. ते दिवसातून १० वाक्ये बोलतात आणि मी त्यांच्या उलट आहे, त्यामुळे त्यांची भूमिका कोण साकारू शकेल हे मला माहीत नाही. पण, कोणीतरी खरंच गंभीर अभिनेता असायला हवा.”

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या महिलेने लांबवला लाखोंचा ऐवज; चोरीची पद्धत वाचून चक्रावून जाल

दरम्यान, सुधा मूर्ती यांना सिनेमांची आवडदेखील आहे. दिवंगत दिलीप कुमार हे त्यांचे आवडते अभिनेते आहेत. एकदा दिलीप कुमार यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या, “बऱ्याच लोकांना त्यांचा मुघल-ए-आझम सिनेमा खूप आवडतो. पण मला ‘मदुमती’ सिनेमा खूप आवडतो. तुमच्यापैकी बहुतेकांचा जन्म झाला नसेल तेव्हा मी तो पाहिला होता. ५ जून १९५८ रोजी मी तो चित्रपट पाहिला होता. दिलीप कुमार खूप चांगले अभिनेते होते.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudha murty wants alia bhatt to play her role in movie hrc