बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चे असते. सुहानाने करोनाचे वाढते संक्रमण पाहता सोशल मीडियावर पोस्ट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आई गौरी खान आणि भाऊ आर्यन खान हे न्यू यॉर्कला निघाले आहेत.

सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. सुहानाने एप्रिल २०२१ मध्ये करोनाची वाढती संख्या दाखवणाऱ्या एका ग्राफचा फोटो शेअर केला आहे. सोबतच ‘करोनाचा स्त्रोत आणि सुरक्षित रहा’ असे कॅप्शन देखील सुहानाने दिले आहे.

सुहानाच्या या पोस्टनंतर गौरी खान आणि आर्यन खान हे दोघे मुंबई विमानतळावर दिसले होते. न्यू यॉर्कला सुहानासोबत राहण्यासाठी जातं असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी गौरीने प्रिंटेड ड्रेस आणि कोट परिधान केलं होतं. तर, आर्यनने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट परिधान केलं होतं. त्यादोघांनी ही मास्क परिधान केला असून करोनाच्या सगळ्या निर्बंधांचे पालण त्यांनी केले होते.

सुहाना सध्या न्यू यॉर्क मध्ये आहे. तिथेच ती फिल्ममेकिंगचे धडे घेत आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लु’ या शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका साकारली होती. सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी तिचे लाखो चाहते आहेत.

दरम्यान, शाहरूख अजूनही मुंबईत आहे. शाहरूख ‘पठाण’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूख सोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

Story img Loader