बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांची लेक सुहाना खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सुहाना खान ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच सुहाना खानने तिचा नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुहाना खानने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती सोफ्यावर ग्लॅमरस स्टाईलमध्ये झोपून पोज देताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या आणि करड्या रंगाचा डीप नेक प्रिटेंड ड्रेस परिधान केला आहे. सुहाना खानचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सुहानाच्या स्टायलिश फोटोचे आणि तिच्या स्टाईलचेही सर्वजण कौतुक करताना दिसत आहे.

हा फोटो पोस्ट करताना सुहाना खानने हटके कॅप्शन दिले आहे. थांबा, मला पोज तर देऊ द्या, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. तिच्या या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनेही या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच अनन्याची आई भावना पांडे, शनाया कपूर आणि तिची आई महीप कपूर यांनीही यावर कमेंट केल्या आहेत.

आर्यन खानला भेटण्याची परवानगी द्या, अरबाज मर्चंट करणार न्यायालयात अर्ज

तिच्या या पोस्टवर अनेकजण लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहे. दरम्यान सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यासाठी ती न्यूयॉर्क सोडून भारतात परत आली असल्याचे म्हटले जात आहे. सुहाना झोया अख्तरच्या ‘अर्चिस’ या सीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहाना सोबत खुशी कपूर, अगस्त नंदा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhana khan looks bold and glamrous in animal print body hugging dress photos viral nrp