सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा प्रसारमाध्यमांसाठी, चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही स्टारकिड्सबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे सुहाना खान. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. तिचं राहणीमान, तिचा फॅशन सेन्स, वैयक्तिक आयुष्य या साऱ्याबद्दल कमालीचं कुतूहल चाहत्यांमध्ये पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर सुहानाचा एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. तो चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे या फोटोमध्ये ती एका मुलासोबत झळकत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाच्या गळ्याभोवती हात टाकून सुहाना उभी असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा मुलगा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर सुहानाच्या एका फॅन क्लबनेचं दिलं आहे. तो मुलगा सुहानाच्या कॉलेजमधला मित्र असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : ‘कलंक’च्या शूटिंगदरम्यान आलिया भट्टला दुखापत

सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर सोशल मीडियावरील तिची चर्चा पाहता पदार्पणापूर्वीच आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात ती यशस्वी होत आहे असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhana khan picture with a handsome young man is going viral