बॉलिवूडपासून सुरु झालेल्या #MeToo या मोहिमेत क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावं समोर आली आहेत. त्यामुळे सध्या देशभरामध्ये #MeToo चे वारे वाहत असल्याचं दिसून येतं. यात लेखक आणि सेलिब्रेटी कन्सल्टंट सुहेल सेठ यांच्यावरही अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. या महिलांमध्येच आता मॉडेल आणि बिग बॉस-८ ची स्पर्धक डायेंड्रा सोरेसनेही सुहेल यांच्यावर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील एका पार्टीमध्ये सुहेल सेठ यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप डायेंड्राने फेसबुकच्या माध्यमातून केला आहे. सुहेल सेठ यांनी बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना चांगली अद्दल घडविल्याचंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुहेल सेठ यांनी पार्टीदरम्यान माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही तर त्यांनी माझं बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना प्रतिकार करत मी जोरात त्यांच्या जीभेचा चावा घेतला. याप्रकारानंतर सुहेल सेठ यांना प्रचंड वेदना होऊन ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे कळवळू लागले. मात्र त्यांना दिलेली ही शिक्षा त्यांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे, असं डायेंड्रा म्हणाली.

यापूर्वी सुहेल सेठ यांच्यावर पत्रकार-लेखिका ईरा त्रिवेदी यांनीही लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा सुहेल सेठ हे चर्चेचा विषय ठरल्याचं दिसून येत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhel seth tongue i bit him diandra soares