लॉकडाउनच्या काळात ठाणे आर्ट गिल्ड आणि लोकसत्ता डॉट कॉम ह्यांच्या सहकार्याने बारोमास टीमने एक नवीन उपक्रम ‘२१ दुणे ४२’ सुरू केला. त्यात अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास उलडून दाखवलाच शिवाय त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचं अभिवाचनही केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनच्या या स्थितीत सगळीकडेच कंटाळवाना दिवस झाला आहे. पण, करोनाच्या या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठी ठाणे आर्ट गिल्ड (टॅग) प्रस्तुत, सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर आधारित सध्या गाजत असलेल्या ‘बारोमास’ या नाटकाची टीम पुढे सरसावली आहे. उत्तम साहित्याचे अभिवाचन आणि त्याचा रसास्वाद हा माणसाला कितीही कठीण परिस्थितीत उभारी देऊ शकतो. हे जाणून हा उपक्रम सुरू करण्यात आला.