बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबतच्या कथित संबंधामुळे चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिनसोबतचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या विषयी कळल्यानंतर सुकेशला वाईट वाटले. गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी सुकेशने एक पत्रक जाहिर केले. यामध्ये सुकेश जॅकलिनची बाजू मांडत म्हणाला, या प्रकरणात तिचा काहीही संबंध नाही. तसेच खासगी फोटो लीक होण्यावर सुकेश म्हणाला की हे गोपनीयतेचे उल्लंघन विरोधात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुकेश चंद्रशेखर यांनी त्यांच्या वकिलामार्फ पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, ‘मी माझे खाजगी फोटो पाहिले, जे व्हायरल झाल्यामुळे मला खूप वाईट वाटले. गेल्या आठवड्यात बातमीच्या माध्यमातून मला याची माहिती मिळाली. हे एकप्राकरे एखाद्याच्या गोपनीयतेचे आणि वैयक्तिक आयुष्यात उल्लंघन केले आहे. मी सर्वांना विनंती करतो की जॅकलिनची चुकीची प्रतिमा दाखवू नका. कारण तिच्यासाठी हे सोपे नाही.

आणखी वाचा : बॉलिवूडमध्ये असा शूट केला जातो सेक्स आणि न्यूड सीन; दिग्दर्शक नव्हे तर ‘या’ व्यक्तीवर असते जबाबदारी

सुकेशने पुढे लिहिले की, ‘मी याआधीही सांगितले आहे की जॅकलिन आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि आमचे नाते कोणत्याही प्रकारे पैशाच्या फायद्यावर आधारित नव्हते. तिने माझ्यावर कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेम केले. आमच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रेम आणि आदर होता. जिथे आम्हाला एकमेकांकडून कोणतीही इच्छा किंवा अपेक्षा नव्हती. जॅकलिनचा माझ्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे मी यापूर्वीही सांगितले आहे.

आणखी वाचा : ‘ऊ अंतावा’ गाण्याला कंटाळलेल्या नेटकऱ्याचा व्हिडीओ शेअर करत समांथा म्हणाली…

सुकेशने या पत्रात जॅकलिन आणि तिच्या कुटुंबाला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंचाही उल्लेख केला आहे. सुकेशने लिहिले की, ‘जॅकलिन किंवा तिच्या कुटुंबाला मी दिलेल्या महागड्या भेटवस्तू सामान्य गोष्टी आहेत. जे कोणीही त्याच्या प्रेमासाठी करते. हे खासगी आहे, या सगळ्या गोष्टीला इतके महत्त्व का दिले जात आहे हे मला कळत नाही. या भेटवस्तू माझ्या वैध कमाईतले आहेत आणि हे लवकरच न्यायालयात सिद्ध होईल.’

Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?

सुकेशने शेवटी म्हणाला, ‘मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या सगळ्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. कृपया जॅकलिनला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण तिने काहीही चुकीचे केले नाही. कोणतीही आशा न ठेवता प्रेम करणे एवढेच तिने केले आहे.’ दरम्यान, सुकेशने जॅकलिनला ५६ लाखांचा घोडा, ३६ लाखांच्या चार मांजरी अशा अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrasekhar defends jacqueline fernandez over viral intimate pics says she is not involved in money laundering dcp