सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अनेक महागडे गिफ्ट दिल्याचे समोर आले होते. आता सुकेशने आणखी ५०० रुपये खर्च करुन जॅकलिनसाठी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलिनला इंप्रेस करण्यासाठी तिच्यावर सुपरहिरो सीरिजचा चित्रपट बनवण्याचा प्लॅन सुकेशने केला होता. एका मोठ्या निर्मात्याचे नाव घेत त्याने ५०० कोटी रुपये खर्च करुन जॅकलिन मुख्य भूमिकेत असणारा सुपरहिरो चित्रपट तिन भागांमध्ये बनवण्याचे वचन दिले होते.
आणखी वाचा : ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर जॅकलिनवर उधळपट्टी करणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?

सध्या जॅकलिन कामाच्या शोधात होती. त्यामुळे तिला मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सुकेशने म्हटले होते. तसेच या चित्रपटासाठी हॉलिवूडमधून काही वीएफएक्स आर्टिस्टला पण बोलावण्यात येणार असून चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात केले जाणार असल्याचे त्याने म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण जॅकलिनने हे खोटे असल्याचे म्हटले होते. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती या पुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल,” असे जॅकलिनच्या वकिलाने म्हटले होते. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात ‘मद्रास कॅफे’ फेम अभिनेत्री लीना मारिया पॉललाही अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrasekhar promised jacqueline fernandez to produce rs 500 crore superhero film avb