मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरने काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केल्याने एकाच खळबळ माजली होती. सुकेश चंद्रशेखरने काही दिवसांपूर्वी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहलं होतं. त्यामध्ये आपचे नेते सत्येंद्र जैन यांनी १० कोटी रुपये तुरुंगात सुरक्षित राहण्यासाठी मागितल्याचा आरोप केला होता. यावर आम आदमी पक्षाने पलटवार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सुकेशला ‘भाजपाचा स्टार प्रचारक’ म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी वक्तव्य केले आहे. ते असं म्हणाली की “गुजरात विधानसभा आणि दिल्ली एमसीडी निवडणुकांमुळे भाजपा ज्या प्रकारे घाबरले आहेत हे दिसून येत आहे.” ते पुढे म्हणाले, ” भाजपाच्या बड्या नेत्यांना सुकेशसारखा महाठग वापरावा लागतोय आता तो भाजपाचा स्टार प्रचारक बनला आहे.” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मी ठग तर केजरीवाल महाठग”, सुकेश चंद्रशेखरचे ‘आप’ला प्रत्युत्तर; म्हणाला, “५०० कोटी…”

सुकेशने केलेल्या आरोपांवर सौरभ भारद्वाज म्हणाले, “तुरुंगात असताना सुकेशने रॅनबॅक्सीच्या माजी मालकाच्या पत्नीकडून पैसे उकळले आणि त्याच्या पत्नीने त्याला पैसे दिले. गृहमंत्र्यांच्या नावानेही पैशांची मागणी करण्यात आली होती. त्याला ऐकणं २१५ कोटी मिळाले आहेत. सुकेश खूप प्रामाणिक माणसू आहे. त्यामुळे भाजपाने सांगावे हे पैसे कुठे ठेवले आहेत?” ते पुढे म्हणाले “गृहमंत्र्यांच्या नावाने उधळलेले २१५ कोटी रुपये कुठे आहेत? अमित शहा आणि भाजपाने आम्हाला सांगावे,” असा सवाल त्यांनी केला.

कोण आहे हा सुकेश?

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. सुकेश चंद्रशेखर मूळचा कर्नाटकचा असून वयाच्या १७ व्या वर्षापासून लोकांची फसवणूक करू लागला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरने १०० हून अधिक लोकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडकली आहे. तिलादेखील सुकेशने महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrashekhar has become bjps star campaigner aap on conmans allegations against kejriwal spg