सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याबद्दल विविध खुलासे होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात साक्ष दिली होती. त्यानंतर आता सुकेश चंद्रशेखरने त्याच्या वकिलांमार्फत एक पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याबरोबर त्याने जॅकलिन निर्दोष असल्याचेही यात नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुकेशने पत्रात म्हटले आहे की, “या प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवलं जाणं हे दुर्देवी आहे. आताही माझ्यावर होणारे आरोप हे फक्त आरोपच आहेत. ही एक केवळ कथा बनवण्यात आली आहे. जी कथा पुराव्यासह न्यायालयात सादर करावी लागेल. यात जॅकलिनला आरोपी बनवण्यात आले आहे, हे तर अत्यंत दुर्दैवी आहे.”
आणखी वाचा : “नोरा फतेही जॅकलिनचा राग करायची, तिने अनेकदा…” सुकेश चंद्रशेखरचा धक्कादायक खुलासा

“आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्यामुळेच मी जॅकलिन आणि तिच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या. यात जॅकलिनचा काहीही दोष नाही. तिने कधीच माझ्याकडे काहीही मागितले नाही. मी तिच्यावर नेहमी प्रेम करावे आणि तिच्या पाठीशी उभं राहावे, एवढीच तिची इच्छा होती. मी जॅकलिनला ज्या काही भेटवस्तू दिल्या त्या सर्व माझ्या मेहनतीने केलेल्या कमाईतून दिल्या. येत्या काळात खटल्याच्या वेळी न्यायालयातही मी हे सिद्ध करेन.

येत्या काळात मी न्यायालयात सिद्ध करेन की, जॅकलिन आणि तिच्या कुटुंबियांना या प्रकरणात जबरदस्तीने ओढले जात आहे. यात त्यांचा काहीही दोष नाही. मला खात्री आहे की जॅकलिनने या काळात जे काही गमावलं आहे ते मी एक दिवस तिला नक्कीच परत करेन. तसेच ती निर्दोष असल्याचेही सिद्ध करेन. माझ्याविरोधात जे काही चालू आहे ते फक्त एक राजकीय षडयंत्र आहे.

जॅकलिनने माझ्याबद्दल दिलेल्या जबाबात जे काही म्हटलंय, त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही, कारण जॅकलिन ही अशी व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करतो आणि तिचा आदरही करतो. ती नेहमीच माझ्या आयुष्याचा एक भाग असेल. तिला जे योग्य वाटते ते ती करु शकते. ती मला कायमच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मी त्याला कधीच विरोध करणार नाही. जॅकलिनकडे जे काही आहे, त्याला मी कधीच नकार देणार नाही. कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यासाठी मी काहीही करु शकतो”, असेही त्याने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी!

दरम्यान सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrashekhar wrote letter from mandoli jail wrote jacqueline fernandez is innocent nrp