स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये आलेल्या अनपेक्षित वळणामुळे प्रेक्षकही हैराण झाले आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात जयदीप गौरीचा कडेलोट करताना दिसला. त्यानंतर तो आणि मानसी घरी येऊन सर्वांना गौरीला बरंच शोधूनही ती सापली नाही असं सांगून खोटं खोटं रडताना दिसले. अशा प्रकारच्या ट्वीस्टमुळे सध्या या मालिकेत बराच ड्रामा पाहायला मिळत आहे. अशात आता या मालिकेचं शाहरुख खानशी कनेक्शन असल्याचं समजतंय. मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता मंदार जाधव म्हणजेच जयदीपची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेत आलेल्या नव्या वळणानंतर अभिनेता मंदार जाधवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याचा कॅप्शनवरून या मालिकेचं कनेक्शन शाहरुख खानशी असल्याचं बोललं जातंय. मंदारनं स्वतःचा एक फोटो पोस्ट करताना त्याला, ‘बाज़ीगर मैं बाज़ीगर,दिलवालों का मैं दिलबर’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या मालिकेत सध्या जयदीप म्हणजे मंदार जाधव खलनायकी भूमिकेत दिसून येतोय. त्यानं गौरी आई होणार हे समजल्यानंतर तो तिला कड्यावरून खाली ढकलून देतो आणि मानसीचा हात पकडतो हे दृश्य पाहिल्यावर शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटात शाहरुखनं काजोलसाठी शिल्पा शेट्टीला अशाचप्रकारे बिल्डिंगवरून खाली ढकललं होतं. यावरून मालिकेतील दृश्य आणि शाहरुखच्या चित्रपटातील सीन यात बरंच साधर्म्य आहे हे लक्षात येतं. त्यामुळेच आता मंदारनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- Video- अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, बॅकलेस ड्रेसमध्ये घरातून बाहेर पडली अन्…

दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील हे अनपेक्षित वळण प्रेक्षकांना फारसं आवडलेलं नाही. एवढंच काय तर अनेकजण जयदीपच्या भूमिकेवर टीकाही करताना दिसत आहे. गौरी आणि जयदीपमधील प्रेम पाहिल्यांनंतर जयदीपनं तिचा अशाप्रकारे केलेला विश्वासघात पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. लवकरच या मालिकेत आणखी काही रंजक घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta know about shahrukh khan connection mandar jadhav instagram post viral mrj