‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अभिनेत्री मिनाक्षी राठोडने नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारेच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. मिनाक्षीचा पती अभिनेता कैलास वाघमारेने याबाबतची माहिती दिली आहे.
मिनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वी मिनाक्षीने तिच्या पतीसोबत डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर त्यांनी बेबी बंपसोबतही फोटोशूटही केले होते. तिच्या या फोटोवर चाहत्यांचे लाइक्स पाहायला मिळत आहे.
“हो आम्ही…”, ‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता होणार बाबा
मिनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने “माय” गोडगोजिरी होऊन परत आली !, असे म्हटले आहे.
त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहे. अनेकांनी त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी ‘अभिनंदन’, ‘वा व्वा..दोघांचे अभिनंदन आणि बाळाचे हार्दिक स्वागत..!!’ अशा कमेंट पाहायला मिळत आहेत.
दरम्यान अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे. तिने प्रेग्नेंसीच्या काळातही मालिकेचे शूट केले होते. सध्या तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.