‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही नुकतंच आई बनली आहे. काही दिवसांपूर्वी मिनाक्षीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. नुकतंच मिनाक्षीने तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.
मिनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने पतीसोबत डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट प्रेग्नेंसीची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर तिने बेबी बंपसह काही फोटोशूटही केले होते. मिनाक्षी आणि कैलासला १० मे २०२२ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.
मिनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सर्वांसोबत ही बातमी शेअर केली होती. त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला होता. त्याला कॅप्शन देताना त्याने “माय” गोडगोजिरी होऊन परत आली !, असे म्हटले होते.
यानंतर आता नुकतंच मिनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मिनाक्षीने तिच्या लेकीसोबतचा पहिला फोटो पोस्ट केला आहे. यात तिच्या लेकीचा चेहरा दिसत नसला. सगळयांनी किती प्रेमाने माझं स्वागत केलेय ! नक्कीच हे जग खूप प्रेमळ असावं! थैंक्यू .., असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहे. अनेकांनी त्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तसेच अनेक कलाकारांनी त्या दोघांचे अभिनंदनही केले आहे.
दरम्यान अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे. तिने प्रेग्नेंसीच्या काळातही मालिकेचे शूट केले होते. सध्या तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.