‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी मिनाक्षी ही आई बनली आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ती नेहमी तिच्या लेकीचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या बाळाच्या नावाबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मिनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने पतीसोबत डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट प्रेग्नेंसीची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर तिने बेबी बंपसह काही फोटोशूटही केले होते. मिनाक्षी आणि कैलासला १० मे २०२२ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर आता चार महिन्यांनी मिनाक्षी आणि कैलासने त्यांच्या बाळाचे नाव ठेवले आहे.
आणखी वाचा : “माय गोडगोजिरी होऊन परत आली…”, अभिनेत्री मिनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारेच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन
नुकतंच मिनाक्षीने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या बाळाचा नामकरण सोहळा पार पडल्याचे काही फोटो शेअर केले आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “असं म्हणतात … नावात काय ठेवलय? पण आयुष्यभर आपली ओळख ज्या नावाने होते ते नाव तर ठेवावेच लागेल! होय! नाव ठरलंय!” असे तिने म्हटले आहे.
मिनाक्षीने तिच्या लेकीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. तिने तिचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. अद्याप तिने ते जाहीर केलेले नाही. अनेकांनी तिच्या फोटोखाली खरच नाव काय आहे बाळाच असा प्रश्न विचारला आहे.
अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे. तिने प्रेग्नेंसीच्या काळातही मालिकेचे शूट केले होते. सध्या तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.