‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही काही दिवसांपूर्वीच आई बनली आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सध्या ते दोघेही पालकत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. कैलास वाघमारे आणि मिनाक्षी यांचे हे पहिले अपत्य आहे. त्यामुळे ते दोघेही फार आनंदित असल्याचे दिसत आहे. अभिनेता कैलास वाघमारे याने नुकतंच त्याचा वाढदिवस साजरा केला. मिनाक्षी राठोड हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली होती.

मिनाक्षी राठोड हिने नुकतंच तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने कैलास आणि तिच्या लेकीचा गोड फोटो शेअर केला होता. यात तिच्या बाळाचे चेहरा मात्र दिसत नाही. मात्र तिने याला हटके कॅप्शन दिले आहे.

success story police son surprised mother with police result emotional video goes viral
“आई तुझा लेक पोलीस झाला गं” तरुणानं कित्येक पिढ्यांचं दुःख दूर केलं; माय-लेकाचा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Video Shows Bride groom Beautiful moment
VIDEO: भटजीबुवांचा स्वॅग! नवरीच्या बोटात अंगठी जाईना हे पाहून भटजींनी केला विनोद; लग्नमंडपात पिकला एकच हशा
Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
actress Gurpreet Bedi kapil arya expecting first baby
“आम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत नव्हतो पण…”, सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज
do you see the richest mother in the world
Video : जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? असे मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आली पाहिजे; महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video Shows Aunt and nephew Beautiful moment
नाते मावशी-भाच्याचे… चंद्रा गाण्यावर ‘तिला’ नाचताना पाहून बॉडीगार्डसारखा राहिला उभा; पाहा चिमुकल्याचा VIDEO
Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर

मिनाक्षी राठोडची इन्स्टाग्राम पोस्ट

“बाळाला जन्म दिल्यानतंर आई चा दूसरा जन्म होतो असं म्हणतात. पण बाप झाल्यापासून तुझाही दूसरा जन्म झाल्यासारखा वाटतोय. म्हणूनच तर असं वेड्यासारखा वागतोय.

मुलीसोबतचा हा नवीन वेडेपणा तुला मुबारक. नवीन जन्म दिवसाच्या खूप खूप सदिच्छा (बाळाचा छान फोटो लवकरच टाकणार आहे)”, असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करणारी गौरी म्हणजे गिरीजा प्रभू हिनेही यावर कमेंट केली आहे. तिने कैलासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे. तिने प्रेग्नेंसीच्या काळातही मालिकेचे शूट केले होते. सध्या तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.

Story img Loader