सुखाच्या सरींनी हे मन बावरे या कलर्स मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे… अनु आणि सिध्दार्थची हळूहळू फुलणारी मैत्री, सिध्दार्थ आणि दुर्गा यांच्यातील आई आणि मुलाचं नातं याचे प्रसंग प्रेक्षकांना आवडत आहेत. तर दुसरीकडे हरी आणि अनुची मैत्री हळूहळू घट्ट होऊ लागली आहे… अनु अजूनही सिध्दार्थला हरीच समजत आहे… तिला अजूनही माहिती नाही सिध्दार्थ हरी नसून खूप मोठ्या कंपनीचा मालक आहे. मालिकेमध्ये आता अनु धाडसी निर्णय घेणार आहे. हा निर्णय काय याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. तर अनु सध्या काम करत असलेल्या कंपनीतील नोकरी सोडून देणार आहे. याठिकाणच्या बॉसच्या विचित्र वागण्यामुळे, तो करत असलेल्या अनावश्यक जवळीकतेला कंटाळून ती हा निर्णय घेणार आहे.
बॉसची ही जवळीक अनुला सहन न झाल्याने ती संपूर्ण स्टाफसमोर बॉसच्या कानाखाली मारते आणि हा जॉब सोडून देते. अनुच्या घरची परिस्थिती बरी नसून ती खूप कष्ट करून सासर आणि माहेर या दोघांचा सांभाळ करत आहे. तिची हीच धडपड, तिचे घरच्यांवर असलेले प्रेम आणि आदर सिध्दार्थला खूप आवडते. अनु तिच्या घरच्या परिस्थतीमुळे खूप अस्वस्थ आहे. तिची स्वप्न आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिला चांगल्या कामाची नितांत आवश्यकता आहे. ही गरज ओळखून हरी म्हणजेच सिध्दार्थ तिच्या मदतीला धावून येतो व तिला मदत करण्याचा निर्णय घेतो.
सिध्दार्थ दुर्गाशी बोलून त्यांच्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी अनुला बोलावतो. अप्रत्यक्षरीत्या सिध्दार्थच मदत करत आहे या सत्यापासून अनु अनभिज्ञ आहे. अनु कंपनीत पोहचल्यानंतर असे काय घडते की दुर्गा अनुला बाहेरचा रस्ता दाखवते? आता पुढे काय होणार? अनु माहेर आणि सासरला कसे सांभाळणार? अजून कुठले संकट अनुवर येणार आहे? त्याला ती कशी सामोरी जाणार ? सिद्धार्थ तिची कशी मदत करणार हे बघणे रंजक असणार आहे. त्यामुळे कलर्स मराठीवर रोज सायंकाळी ८ वाजता लागणाऱ्या सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेतून या प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहेत.