गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अपघाताची संख्याही वाढताना दिसत आहे. सिग्नल तोडणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, मद्यप्राशन करुन गाडी चालवणे, यासारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटना लक्षात घेऊन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक ट्वीट केले आहे. त्याच्या या ट्वीटला अभिनेता सुमीत राघवनने रिट्वीट केले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने एक प्रश्न विचारला आहे. सिग्नल मोडणाऱ्या आणि चुकीच्या बाजूने गाडी चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे, असे ट्वीट सचिन तेंडुलकरने केले आहे.
आणखी वाचा : अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर
सचिनने केलेल्या या ट्वीटला सुमीत राघवनने रिट्वीट केले आहे. त्यात त्याने सचिनची पाठराखण केली आहे. “आता मजा येणार…. मास्टर ब्लास्टरने काय कमाल ट्वीट केले आहे. यामुळे संपूर्ण व्यवस्थेत आता तरी सुधारणा होईल. धन्यवाद सचिन. आम्ही बोलून बोलून थकलो”, असे सुमीत राघवन ट्वीट करत म्हणाला. सुमीतने हे ट्वीट मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.
आणखी वाचा : “म्हणे मी पुण्याचा…” स्वप्निल जोशीने मराठीत ट्वीट करताना चुकवले तीन शब्द, नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले
दरम्यान सचिन तेंडुलकर आणि सुमीत राघवनच्या या ट्वीटला अद्याप मुंबई पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या ट्वीटवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण यावर कमेंट करत विविध समस्याही सांगताना दिसत आहेत.