शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासगळ्यावर सोशल मीडियावर सर्वसाधारण व्यक्ती नाही तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रतिक्रिया देत आहेत. तर आता अभिनेता सुमीत राघवननं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

सुमीत राघवनने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीतने एका वृत्तपत्रिकेतील एक लेख शेअर केला आहे. हा लेख शेअर करताना सुमीत म्हणाला, एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?

आणखी वाचा : “अभद्र युत्या, पक्षनिष्ठा…”; महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

सुमीत राघवनने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : “आणखी कोणाला असं वाटतंय…”, जिनिलियाने शेअर केलेला ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

सुमीतची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?”

सुमीतने नेटकऱ्याने केलेल्या ट्वीटवर उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

त्यावर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करावी लागत होती आणि ती आम्हाला मान्य नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

“त्यापुढे आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही,” अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली होती.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

“गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumeet raghvan shares post of news article and asked a question to eknath shinde about maharashtra political situation dcp