‘द कपिल शर्मा शो’ हा शोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमधील प्रत्येक कलाकारांचा चाहता वर्ग हा मोठा आहे. त्यापैकी एक म्हणजे सुमोना चक्रवर्ती आहे. या शोमध्ये सुमोना भूरी म्हणजेच कपिलच्या पत्नीची भूमिका साकारते. त्या दोघांमध्ये सुरु असणारी मस्ती प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सुमोना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुमाना चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, यावेळी सुमानाच्या फॅन क्लबने तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमोनाच्या फॅनक्लबन त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुमाना पूलमध्ये असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सगळ्यांना प्रचंड आवडला आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायली हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

सुमोनाने २४ जुनला तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सुमोना सोलो ट्रीपवर गेली होती. तिच्या सोलो ट्रीपचे फोटो शेअर करत वाढदिवसानिमित्त सुमोना पहिल्यांदा सोलो ट्रीपचा आनंद घेत असल्याचे सुमोनाने सांगितले होते. त्या ट्रीपमधील सुमोनाचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : विराट कोहली पाकिस्तानच्या टीम मधून खेळतोय?

सुमोनाला कदाचित ‘द कपिल शर्मा शो’मधून लोकप्रियता मिळाली असेल. पण तिने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. सुमोनाने ‘बडे अछे लगे हैं’, ‘एक थी नायक’, ‘नीर भरे तेरे नैना देवी’ मध्ये काम केले आहे. याशिवाय तिने आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘मन’ या चित्रपटामध्ये बाल अभिनेता म्हणून काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumona chakravarti aka bhuri pool side photo viral on social media dcp