‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. या मालिकेतील लतिकाने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेतील लितिका आणि अभिमन्यूची केमिस्ट्री प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. तर इंदू आणि लतिका मधील सासू सुनेचं गोड नातं चाहत्यांच्या पसंतीस उतरतंय.
या मालिकेच्या निमित्तानेच लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ या कार्यक्रमात मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. यावेळी अक्षयाने तिचा मालिकेपर्यंतचा प्रवास ते सेटवरील धमाल अशा अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. लतिका प्रमाणेच अक्षयाला देखील तिचं कुटुंब म्हत्वाचं आहे. तसचं लतिकाप्रमाणेच अंगकाठीमुळे अक्षयालादेखील काही गोष्टींचा सामना करावा लागला होता. मात्र या सगळ्यावर मात करत आज अक्षयाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.
सेटवर शूटिंग दरम्यान अक्षया आणि अभिनेता समीर परांजपे तसंच सर्वच कलाकार कश्या प्रकारे धमाल करतात याबद्दल अक्षयाने सांगितलं. त्याचप्रमाणे अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास तिने या मुलाखतीत उलगडला आहे.