कलाकार हे त्यांची भूमिका निभावण्यासाठी आणि त्यात एक जीव ओतण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतात आणि सगळ्यात कधी त्यांना दुखापत देखील होती. अशीच परिस्थिती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया नाईकवर आली आहे. सेटवर अपघात झाल्याने लतिकाच्या पायाला दुखापच झाली आहे. अक्षयाने याविषयी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.
अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयाने तिच्या दुखापती विषयी सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया व्हिलचेअवर बसल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “The show must go on असं आपण सगळेच बोलतो, पण जीवापेक्षा मोठं दुसरं काही नाही. कलर्स मराठीचे मी आभार मानते की त्यांनी माझ्या प्रक्रूतिनुसार कथेत काही बदल करून मला आरामासाठी वेळ दिला. लिगामेंट टीअर असल्यामुळे सध्या आराम हाच उपाय आहे, बाकी डॉक्टर सांगतिलच. तुम्ही सुंदरा… बघत रहा कारण आपली भेट होतच राहिल टीव्हीवर. आमच्या दिग्दर्शकांची टीम, कॅमेरा टीम आणि क्रु मेम्बर्सना मनापासून आभार आणि And of course the best co-actors that I’ve got”, असे कॅप्शन अक्षयाने दिले आहे.
आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट
आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?
अक्षयाने या आधीही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते ज्यामधून तिला दुखापत झाल्याचे दिसत होते. तशा परिस्थितीतच ती मालिकेचं चित्रीकरण करत होती. अक्षयाही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.