‘सासूसुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम’, असं म्हणत सुरू झालेली ‘सुंदर आमचे घर’ ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे. कारण काव्या आता लग्न होऊन राजपाटील यांची सून होऊन घरी येणार आहे. सुभद्रा आणि काव्या यांच्यामधलं म्हणजेच सासू-सुनेमधलं मैत्रीचं नातं कसं फुलतं, हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जुने आणि आधुनिक वैचारिक भेद यामुळे घरात काय घडतं, हे ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत पाहायला मिळतं आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या राज पाटील कुटुंबात स्त्रियांचं महत्त्व पटवून देण्यात काव्या म्हणजेच मालिकेची नायिका आता यशस्वी होते का, त्यासाठी ती काय करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Bal Shivaji Park, Marathi Bhavan, Ulhasnagar,
उल्हासनगरात बाल शिवाजी उद्यान, महिला, मराठी भवन; उल्हासनगरच्या बोट क्लबचेही सुशोभीकरण होणार, निधी मंजूर
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

आणखी वाचा : “हे वैयक्तिक मत आहे…”, अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणने केलेले वक्तव्य चर्चेत

काव्या लग्न करून राज पाटील यांच्या घरात येण्याआधीच तिची सुभद्राशी म्हणजेच तिच्या सासूशी चांगली गट्टी जमली आहे. काव्याचं तिच्या सासूशी जमलेलं चांगलं सूत काव्याची आजेसासू म्हणजे नारायणी बिघडवू शकते का किंवा बिघडवण्यासाठी काय करते, हे बघणं आता मनोरंजनात्मक ठरणार आहे. या सासू-सुनेच्या जोडीची मैत्री नारायणी होऊ देते की नाही, हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. ही मालिका सासू आणि सून यांच्यामध्ये असणारं मैत्रीचं नातं अधोरेखित करणार आहे. तीन पिढ्यांतल्या सुना म्हणजे काव्या, सुभद्रा आणि नारायणी एकाच घरात वावरत असताना काय गमतीजमती घडतात, हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

तीन वेगवेगळ्या पिढ्यांतल्या स्त्रिया एका घरात एकत्र नांदू लागल्यानंतर एकाच गोष्टीकडे बघण्याचे तीन वेगवेगळे दृष्टिकोण आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आता नारायणी आणि काव्या यांची वैचारिक जुगलबंदी मालिकेत रंगणार आहे. त्याचबरोबर नारायणी काव्याला नातसून म्हणून स्वीकारणार का, रितेश आणि काव्याचं लग्न नारायणी टिकू देणार का, काव्याशी नारायणी कशी वागणार, काव्या राजपाटील कुटुंबाच्या विचारसरणीला बदलू शकेल का; या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा, ‘सुंदर आमचे घर’, २५ एप्रिलपासून सोम.-शनि. , रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Story img Loader