घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळतंय. आपले सगळ्यांचे आवडके कलाकारदेखील गणरायाच्या सेवेत लीन झाले आहेत. कलाधिपती गणपती आणि कलाकारांचं तसं फार जवळचं नातं असतं. यात लाडक्या गणरायाकडे ‘सुदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिका आणि अभिमन्यूने साकडं घातलं आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिकाने म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने गणरायाकडे मनोरंजन क्षेत्रासाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी साकडं घातलं आहे. लवकरात लवकरच नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु व्हावं असं साकडं तिने बाप्पाकडे घातलं आहे. तसचं तिने बाप्पाकडे एक इच्छा देखील व्यक्त केली आहे.
तसंच या म मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपेने गणरायाला वंदन करून बाप्पाकडे मनातली इच्छा व्यक्त केली आहे. तसचं कलाक्षेत्रात जास्तीत जास्त चांगल काम हातून घडो यासाठी त्याने बाप्पाकडे आशिर्वाद मागितला आहे. या मालिकेतही गणेशोत्सवाती धूम पाहायला मिळणार आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील येत्या भागात गणेशोत्सवाती धूम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.