अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी तिच्या खाजगी आयुष्यामुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. अथिया आणि क्रिकेटपटु के एल राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच वांद्रे येथील पाली हिल परिसरात के एल राहुलने कोट्यावधी रुपयांचं घर खरेदी केलं असल्याची बातमी समोर आली होती. आता अथिया-के एल राहुल डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे.

अथिया-के एल राहुल कधी लग्न करणार? याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. डिसेंबरमध्ये या दोघांनी लग्न करण्याचं नक्की केलं असल्याचं बोललं जातंय. त्याचबरोबरीने सुनिल शेट्टीने देखील आता लेकीच्या लग्नासाठी कंबर कसली आहे. त्याने हॉटेल, कॅटरर्स आणि डिझायनर लग्नासाठी बुक केलं असल्याची चर्चा आहे. आपल्या लाडक्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी त्याची इच्छा आहे.

शेट्टी कुटुंबियांमध्ये देखील सध्या आनंदाचं वातावरण आहे. इतर वडिलांप्रमाणेच सुनिलची देखील आपल्या मुलीबाबत काही स्वप्नं आहेत. शेट्टी कुटुंबियांची तयारी पाहता अथिया-के एल राहुलचं लग्न धुमधडाक्यात होणार असल्याची चिन्ह दिसताहेत. मात्र याबाबत अजूनही सुनिल शेट्टी, अथिया किंवा के एल राहुलने खुलासा केलेला नाही.

आणखी वाचा – सावत्र आईला भेटायला गेली सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी, फोटो शेअर करत म्हणाली…

अथिया-केएल राहुल सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. अथियाच्या वाढदिवसादिवसानिमित्त तर के एल राहुलने तिच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘आय लव्ह यु माय लव्ह’ असं म्हटलं होतं. आता या दोघांच्या विवाहसोहळ्याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Story img Loader