बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मदत करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सलमानचं नावं देखील असतं. सलमान खान आता कोटींमध्ये कमाई करत असला तरी एकेकाळी त्याच्याकडे पैशांची फार कमतरता होती. नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत सलमानने खुलासा केला आहे की, त्याच्याकडे पैसे नसताना चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्याला कशी मदत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी सलमानने या मुलाखतीत सांगितले. “एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते. माझ्याकडे फक्त शर्ट किंवा जीन्स विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे होते. त्या काळात स्टोन-वॉश जीन्स ही नवीन फॅशन होती. मी एका लोकप्रिय स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो होतो जिथे मला स्टोन वॉश डेनिम जीन्स आणि शर्ट दिसला. माझ्याकडे फक्त जीन्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे होते, म्हणून मी शर्ट विकत घेतला नाही. त्यावेळी दुकानात माझ्यासोबत सुनील शेट्टी होता, त्याच्या लक्षात आले की माझ्याकडे शर्ट घेण्यासाठी पैसे नाहीत. तेव्हा सुनीलने तो शर्ट विकत घेतला आणि मला भेट म्हणून दिला,” असे सलमान म्हणाला.

आणखी वाचा : “तरुण दिसण्यासाठी मी विष्ठा सुद्धा खायला तयार आहे”; अभिनेत्रीचे धक्कादायक विधान

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

याविषयी बोलताना भावूक झालेल्या सलमानला पाहून सुनील शेट्टीचा मुलगा अहानने त्याला मिठी मारली. पुढे सलमान म्हणाला, “सुनीलने पाहिले की माझी नजर एका पाकीटावर देखील होती पण मी ते विकत घेतले नव्हते. यानंतर सुनील मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने मला तेच पाकीट भेट दिले.”

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

याच कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला, “अभिनयात पदार्पण केल्यानंतरचे त्याचे काही दिवस फार चांगले नव्हते. ‘मैने प्यार किया’ रिलीज झाल्यानंतर भाग्यश्रीने चित्रपट न करण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय मिळाले आणि पुढील ६ महिने माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. यानंतर माझ्या आयुष्यात देवाने रमेश तौरानी यांना पाठवले. त्यावेळी माझ्या वडिलांनी २ हजार रुपये दिले आणि निर्माते जीपी सिप्पी यांना, त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात साईन केल्याची खोटी बातमी एका मासिकाला सांगण्यास सांगितले. या फेक न्यूजनंतर रमेश तौरानी स्वतः सिप्पी साहेबांच्या ऑफिसमध्ये आले आणि चित्रपटाच्या संगीत हक्कांसाठी ५ लाख रुपये दिले. या ५ लाख रुपयांमुळेच मला ‘पत्थर के फूल’ हा चित्रपट मिळाला.”

आणखी वाचा : चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेणारा अक्षय एका जाहिरातीसाठी किती पैसे घेतो माहितये का?

यानंतर सलमान खानने निर्माते बोनी कपूर यांनाही मिठी मारली. मग तो म्हणाला, “बोनी जींनी मला आयुष्यभर मदत केली. जेव्हा माझे करिअर खडतर टप्प्यातून जात होते, तेव्हा बोनीजींनी मला ‘वॉन्टेड’ हा चित्रपट दिला ज्यामुळे मी परत आलो. यादरम्यान सलमान विनोदाच्या स्वरात म्हणाला, ‘यानंतर बोनीजींनी मला ‘नो एंट्री’ चित्रपट दिला ज्यामुळे अनिल कपूर पुन्हा एन्ट्री करू शकले. सलमानच्या या बोलण्यावर कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suniel shetty gifted me clothes when i did not have enough money says salman khan dcp