मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकताच त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्यासोबतच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटक क्षेत्रात काम केले आहे. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ही यावेळी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी अशोक सराफ यांचे काही किस्से सांगितले आहेत.
आणखी वाचा : मलायकाच्या घरी पोहोचले पोलिस, व्हिडीओ व्हायरल होताच कारण आले समोर
यावेळी सुनील हे त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. त्यावेळी सुनील गावस्कर म्हणाले, “आम्ही लहान असताना अशोकला शाळेत जाताना पाहायचो. तेव्हा आम्ही विचार करायचो की अशोक हा वेळेच्या पुढचा विचार करणारा आहेस. ते कसं होतं, १९६० च्या दरम्यान अशोक अर्धी चड्डी घालायचा म्हणजे गुडघ्यापर्यंत…तेव्हा अशी अर्धी चड्डी कोणी घालतं नव्हतं. पण एक २० वर्षांनंतर १९८० मध्ये पीट सॅम्प्रस या टेनिस प्लेअरने अगदी फेमस केली. खरतरं २० वर्षांआधीच अशोकने ही फॅशन आणली होती.”
आणखी वाचा : ‘अक्षयने माझा वापर केला आणि मला सोडून दिले ’, शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा
आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही
‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही काळापूर्वी त्यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम केलं होतं. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अशोक मामांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.